Today's news

Principal's Message

principal

Dr. U. D. Joshi

Professor M.Sc (Physics), Ph.D.

Yogeshwari Education Society is firmly committed to providing value-based education to socially and economically backward students at affordable cost thereby enriching national human resource.

    We believe it is the moral duty of each & every teacher to inculcate human values ​​along with formal education to lead the society in right direction. A teacher’s reputation is based on how he/she develops skills in the students and help to build a well-cultured society. 
Read more

Alumni Student

Women Empowerment 2018 - Tatwashil Kamble

              माणूस आणि समाज याचे नाते समजून घेण्यासाठी आजच्या युवतीमध्ये वेगळी दृष्टी असली पाहिजे. ती दृष्टी विकसीत करून जागृत ठेवली तर समाजाच्या सशक्तीकरणासाठी आपला देखील हातभार लागेल. आणि समाज प्रगतीकडे झेप घेईल असे मत सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी येथे व्यक्त केले.
                योगेश्वरी शिक्षण संस्था संचलीत योगेश्वरी क्रिडा प्रबोधिनी श्रीमती कमल खुरसाळे न्यास यांच्या संयुक्त  विद्यमाने आयोजित महिला आत्मभान शिबीरात हुंडा बदीं व बाल विवाह या विषयावर ते बोलत होते. अध्यक्षस्थानी योगेश्वरी शिक्षण संस्थेचे सहसचिव मेजर शांतीनाथ बनसोडे हे होते. विद्यार्थीनींना मार्गदर्शन करताना कांबळे म्हणाले की, बालविवाह किंवा हुंडाबंदी या गोष्टी बंद करणे युवतींच्या हातात असून कुठल्याही अमिशाला बळी न पडता आत्मविश्वासाच्या जोरावर आजच्या युवती अशा निरर्थक गोष्टी निश्चितच बंद करतील आणि सुधारलेल्या समाजात देशाचा विकास साधतील जीवनात यशस्वी होण्यासाठी काही मुल्ये आत्मसात केली पाहिजेत शासनाच्या  कायद्यानुसार अनेक गोष्टी व कायदे अस्तित्वात आहेत. परंतु त्याची माहिती महिलांपर्यंत पोहोंचत नाही. त्यामुळे महिलांची सुरक्षीतता वार्‍यावर आहे. महिलांचा लढा केवळ पुरूषाविरूद्ध नसुन अहंकाराविरूद्ध आहे. हुंडा बंदी  हा कायदा असताना मुलगा आणि मुलगी या दोन्ही घरांच्या समीकरणातून हुंडा घेतला जातो. ही मानसिकता बदलण्याची गरज असून शिक्षणाच्या माध्यातून हुंडा बंदी आणि बालविवाह याची चिकित्सा करून महिला वरील अत्याचार दुर केला पाहिजे प्रामुख्याने घटनेने तसे अधिकारी दिले आहेत. परंतु महिलांची निर्णय क्षमता प्रखर नसल्याने  हे अधिकार वापरल्या जात नाहीत. अशा प्रकारच्या शिबीरातून विद्यार्थीनींनी समाजात बालविवाह किंवा हुंडा बंदी या बद्दल जागृती निर्माण केली पाहिजे. तरच आत्मभान शिबीर निश्चितच प्रेरणादायी ठरेल. अध्यक्षीय समारोपात मेजर बनसोडे म्हणाले की, महिलांनी निष्क्रीय संस्कृतीचे आक्रमण रोखून स्वतःचे स्थान समर्थपणे उभे करण्याची गरज आहे. आणि स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून भ्रामक कल्पना दुर करून मनाचा उत्साह वाढविला पाहिजे. युवतींनी समाज सशक्ती करण्यासाठी प्रयत्न करावेत असे सांगितले.विद्यार्थिनीनी विचारलेल्या प्रश्नास पाहुण्यांनी उत्तरे दिली  पाहुण्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन साधना ठोंबरे हिने परिचय गौरी लोमटे तर उपस्थितांचे आभार साक्षी पुरी हिने मानले.

Photo Gallery

 • 0-00-0.jpeg
 • 0-000.jpeg
 • 0-001.JPG
 • 0-003.JPG
 • 0-004.JPG
 • 0-01.jpg
 • 0-02.jpg
 • 0-03.jpg
 • 0-04.jpg
 • 0-2.JPG
 • 0-3.JPG
 • 0-4.JPG
 • 0-5.jpg
 • 0-6.jpg
 • 0-7.jpg
 • 0-8.jpg
 • 0-10.jpg
 • 0-11.jpg
 • 0-12.jpg
 • 0-13.jpg